गोल्डन व्हिसा हे एक विशेष परवाना आहे जो आर्थिकदृष्ट्या सक्षम व्यक्तींना दुसऱ्या देशात कायमस्वरूपी राहण्याची संधी देतो.
या व्हिसाच्या आधारे तुम्ही त्या देशात राहू शकता, काम करू शकता, शिक्षण घेऊ शकता आणि वैद्यकीय सेवा मिळवू शकता.
गोल्डन व्हिसामुळे तुमच्या कुटुंबालाही दुबईमध्ये राहता येतं.
या व्हिसावर तुम्हाला वैधपणे घरकामासाठी कर्मचारी ठेवण्याची मुभा असते.
गोल्डन व्हिसावर तुम्ही दुबईमध्ये कोणतेही व्यावसायिक काम करू शकता.
मालमत्ता विकल्यानंतर मालमत्ता-आधारित व्हिसाची मुदत संपते. परंतु, नामांकनावर मिळालेला व्हिसा कायमस्वरूपी असतो.
या विशेष व्हिसासाठी यूएई सरकारने भारताला सर्वात आधी नामांकनाधारित गोल्डन व्हिसासाठी निवडले.
हा व्हिसा भारत आणि यूएईमधील वाढत्या व्यापारिक आणि सांस्कृतिक संबंधांचे उदाहरण आहे.
या नामांकन प्रक्रियेची सुरुवात भारत आणि बांगलादेशपासून झाली आहे, पुढे इतर देशांनाही समाविष्ट केलं जाईल.
रायड ग्रुप आणि व फ स हे दोन संस्थांना अधिकृतपणे अर्ज तपासण्यासाठी नेमले आहे.