चांदीच्या किमतीत प्रचंड वाढ फक्त 6 महिन्यांत दर 87,000 रुपयांवरून 1.04 लाख रुपये प्रति किलोवर पोहोचले.

Published by: कुलदीप माने, एबीपी माझा

तज्ज्ञांच्या मते, चांदीचे दर या वर्षात दुप्पट होऊ शकतात चांदी हा गुंतवणुकीसाठी फायदेशीर ठरू शकतो.

आंतरराष्ट्रीय बाजारात सध्या चांदी 35 डॉलर प्रति औंस दराने उपलब्ध आहे किंमत 70 डॉलरपर्यंत पोहोचण्याची शक्यता

गेल्या दोन वर्षांत चांदी 60% पेक्षा अधिक महागली आहे.

बाजार विश्लेषकांचा अंदाज असा आहे की चांदी 2 लाख रुपये प्रति किलो दराजवळ पोहोचू शकते.

रॉबर्ट कियोसाकी यांनी दावा केला की चांदीचे दर दुप्पट होण्याची शक्यता थोडी जास्त वाटू शकते.

इस्रायल-इराण तणावामुळे गुंतवणूकदार सोन्यात गुंतवत आहेत.

क्रूड ऑईलमध्ये 13% वाढ, डॉलर इंडेक्समध्ये कमजोरी, यामुळे जागतिक अर्थव्यवस्थेवर दबाव निर्माण झाला आहे.

भारत आणि चीनकडून मोठ्या प्रमाणात सोने खरेदी त्यामुळे सोन्याचे दर सातत्याने वाढत आहेत.

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)