गेल्या चार दिवसांपासून सोन्या-चांदीच्या दरात घसरण सुरू आहे.

सोन्या चांदीच्या किंमती कमी हो असल्यामुळं खरेदीदारांना दिलासा मिळाला आहे.

सोने 74367 रुपयांवरुन 71500 रुपयांच्या आसपास घसरले आहे.

सोन्याच्या किंमतीत ही घसरण मल्टी कमोडिटी एक्सचेंज (MCX) वर दिसून आली आहे.

तर 20 मे 2024 रोजी चांदीने आपला सार्वकालिक उच्चांक गाठला होता.

या दिवशी चांदीची किंमत 95,267 रुपये प्रतिकिलोपर्यंत पोहोचली होती.

परंतू, तेव्हापासून त्याची किंमत दररोज घसरत आहे.

मात्र, आज त्याची किंमत किलोमागे 600 रुपयांनी वाढली आहे.

एमसीएक्सवर 5 जूनच्या फ्युचर्ससाठी एक किलो चांदीचा भाव हा 91045 रुपये आहे.

अशा स्थितीत गेल्या चार दिवसात चांदी 4,222 रुपयांनी स्वस्त झाली आहे.