अलीकडच्या काळात अनेक शेतकरी (Farmers) आपल्या शेतीत नवनवीन प्रयोग करत आहेत.
आधुनिक तंत्रज्ञानाच्या माध्यमातून भरघोस उत्पादन घेत आहेत.
उत्तर प्रदेशातील (UP) बलिया जिल्ह्यातील नवीन कुमार राय या शेतकऱ्याने आंबा पिकातून मोठं उत्पन्न घेतलं आहे.
विशेष म्हणजे या शेतकऱ्याचे शिक्षण फक्त 8 वी झालं आहे.
तरीदेखील योग्य नियोजन करुन नवीन कुमार शर्मा यांनी लाखो रुपयांचा नफा मिळवला आहे.
या शेतकऱ्याने तब्बल 8 ते 9 लाख रुपयांचे वार्षिक उत्पन्न मिळवले.
नवीन कुमार राय यांनी 5 वर्षांपूर्वी आपल्या वडिलोपार्जित जमिनीवर आंब्याचे झाडे लावली होती.
नवीन कुमार राय यांनी आम्रपाली आंब्याची लागवड केली आहे.
आम्रपाली आंबा त्याच्या गोडपणामुळं खूप प्रसिद्ध आहे. बाजारात त्याची किंमत 150 ते 200 रुपये किलोपर्यंत पोहोचते.
या हंगामात चांगला नफा मिळत अल्याची माहिती राय यांनी सांगितली.