गेल्या काही दिवसांपासून सोने आणि चांदीच्या दरात
चढऊतार पाहायला मिळत आहे.
मात्र एकंदरीतच या चढउताराच्या काळात या दोन्ही
धातूंची किंमत वधारल्याचे पाहायला मिळत आहे.
सध्या जागतिक पातळीवर सोने, चांदीच्या मागणीत वाढ झाली आहे.
त्याचाच परिणाम म्हणून आज जळगावमधील सुवर्ण नगरीत जीएसटीसह
सोन्याचे दर तब्बल 76500 (दहा ग्रॅम) तर
चांदी 96000 हजार रुपये इतक्या विक्रमी पातळीवर जाऊन पोहोचली आहे.
सोने व्यावसायिकांनी दिलेल्या माहितीनुसार जागतिक पातळीवर सोन्याची मागणी वाढली आहे.
सोने आणि चांदीची खरेदी ही एक सुरक्षित गुंतवणूक मानली जाते.
त्यामुळेच भारताचे शेजारील चीन या देशाने सोने आणि
चांदीमध्ये गुंतवणूक करण्यास सुरुवात केली आहे.