पतधोरण विषयक समितीची बैठक 5 ते 7 फेब्रुवारी दरम्यान होती.
यावेळी संजय मल्होत्रांनी भारतीय अर्थव्यवस्था चांगल्या परिस्थितीत असल्याचं सांगितले.
या बैठकीत एकमतानं 25 बेसिस पॉइंटनं कमी करण्याचा निर्णय घेण्यात आला.
6.25 % रेपो रेट, एसडीएफ रेट 6.0 %, एमसीएफ आणि बँक रेट 6.5 % असेल असं संजय म्हलोत्रा म्हणाले.
आरबीआयच्या गेल्या सात पतधोरण समितीच्या बैठकीमध्ये रेपो रेट स्थिर ठेवण्यात आला होता.
पुढील आर्थिक वर्षात (2025-2026) GPD पहिल्या तिमाहीत 6.7, दुसऱ्या तिमाहीत 7, तिसऱ्या तिमाहीत 6.5, आणि चौथ्या तिमाहीत 6.5 टक्के राहील असा अंदाज म्हलोत्रांनी व्यक्त केला.
रिझर्व्ह बँके ऑफ इंडियाच्या पतधोरण समितीचं जागतिक घडामोडींवर लक्ष असेल, असं संजय म्हलोत्रा म्हणाले.