भारतात लग्नापासून दिवाळी आणि धनत्रयोशीसारख्या सणांवेळी सोन्याला खूप मागणी असते.
भारतात सोन्याच्या मूळ किमती व्यतिरिक्त करसुद्धा लागतो, ज्यामुळे सोन्याची किंमत अजून वाढते.
भारताच्या तुलनेत दुबईत सोनं स्वस्त मिळतं
अशात भारतातून दुबईला जाणारे पर्यटक तिथून सोनं आणणं पसंत करतात
खरंतर, भारताच्या तुलनेत दुबईत सोन्याची किंमत फारच कमी आहे, कारण इथे सोन्यावर कर लागत नाही.
अशात जर तुम्हीसुद्धा दुबईतून सोनं खरेदी करण्याचा विचार करत असाल, तर आधी यासंबंधित काही नियम आहेत, ते जाणून घ्या.
जर तुम्ही 6महिने किंवा एका वर्षापासून परदेशात राहात असाल तर, भारतात सोनं आणण्यासाठी तुम्हाला थोडी सवलत मिळते.
दुबईतून भारतात येताना एक पुरुष पर्यटक आपल्यासोबत 20 ग्रॅम सोनं [जास्तीत जास्त 50,000 रुपयांपर्यंत] कस्टम ड्युटी न भरता आणू शकतो.
दुबईतून भारतात येताना एक महिला पर्यटक आपल्यासोबत 40 ग्रॅम सोनं [जास्तीत जास्त एक लाख रुपयांपर्यंत] कस्टम ड्युटी न भरता आणू शकते.
यासोबतच 15 वर्षांखालील मुलांसाठी ड्युटी फ्री गोल्डचं लिमिट 40 ग्रॅम आहे.