भारतीय रिझर्व्ह बँकेच्या पतधोरण समितीची द्वैमासिक बैठक बुधवारी पार पडली.

Image Source: PTI

या बैठकीनंतर गव्हर्नर संजय मल्होत्रा यांच्याकडून रेपो रेटमध्ये कपात करण्याची घोषणा केली.

Image Source: PTI

रेपो रेट 6.25 टक्क्यांवरुन 6 टक्क्यांवर आला आहे.

Image Source: PTI

जर बँकांनी कर्जावरील व्याजदर 0.25 टक्क्यांनी घटवल्यास गृहकर्ज आणि वाहन कर्जाचे हप्ते फेडणाऱ्या सर्वसामान्य ग्राहकांना मोठा दिलासा मिळू शकतो.

Image Source: IsTOCK

रिझर्व्ह बँकेच्या नियमानुसार 1 ऑक्टोबर 2019 नंतर ज्यांनी फ्लोटिंग व्याजदरावर कर्ज घेतलं आहे त्यांना बाहेरच्या बेंचमार्कशी जोडणं गरजेचे आहे.

Image Source: PTI

त्यामुळे आरबीआयनं रेपो रेट घटवल्यास बँकांनी देखील गृह कर्जावरील व्याजदर कमी करणे अपेक्षित आहे.

Image Source: PTI

समजा तुमच्या गृहकर्जाचा व्याजदर 8.50 टक्के असेल तर त्यामध्ये 0.25 टक्क्यांची कपात होऊन तो 8.25 टक्क्यांवर येईल.

Image Source: IsTOCK

टीप : वरील सर्व गोष्टी माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. एबीपी माझा यातून कोणताही दावा करत नाही.

Image Source: unsplash