गेल्या अनेक महिन्यांपासून सोन्याच्या भावात वाढ होत असल्याने ग्राहकांच्या खिशाला मोठी झळ बसली होती.
Published by: जयदीप मेढे
Image Source: Meta AI
मात्र गेल्या तीन दिवसांपासून सोने व चांदीच्या भावात घसरण होत आहे.
Image Source: Meta AI
त्यामुळे ग्राहकांना कुठेतरी दिलासा मिळाला आहे.
Image Source: Meta AI
गेल्या तीन दिवसात सोन्याच्या भावात 4 हजाराने (10 ग्राम)तर चांदीच्या भावात 11 हजार (1 किलो) रुपयांची घसरण झाली आहे.
Image Source: Meta AI
त्यामुळे सराफ बाजारामध्ये सोने व चांदी खरेदी करण्यासाठी ग्राहकांनी मोठी गर्दी होईल असा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
Image Source: Meta AI
आंतरराष्ट्रीय बाजारात सुरु असलेल्या घडामोडींमुळे पुढील काही दिवसांमध्ये सोन्याचा दर प्रतितोळा 55 हजारापर्यंत खाली येऊ शकतो असा अंदाज तज्ज्ञांकडून वर्तवला जात आहे.
Image Source: Meta AI
त्यानुसार गेल्या काही दिवसांमध्ये सोने आणि चांदीचे भाव सातत्याने खाली येत आहेत.
Image Source: Meta AI
सोन्याचा प्रतितोळा दर काही महिन्यांपूर्वी 96 हजारांवर पोहोचला होता.
Image Source: Meta AI
टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.