असं असलं तरी पैसे काढण्याकरीता आजही लोकांना बँकेत जावे लागते.
एटीएममध्ये जाऊनही सहज पैसे काढता येतात.
परंतु एटीएम कार्ड वापरताना काही चुका टाळणे खूप महत्त्वाचे आहे.
सुरक्षित आणि शक्यतो बँकेच्या परिसरात असलेले ATM वापरा.
चार अंकी पिन टाइप करताना कीपॅड झाकून ठेवा, जेणेकरून जवळच्या व्यक्तींना आणि CCTV कॅमेऱ्यात दिसणार नाही.
ज्या एटीएममध्ये सुरक्षारक्षक आहेत अशाच एटीएमचा वापर करा.
कीपॅड आणि कार्ड स्लॉट तपासा, जर ते संशयास्पद वाटल्यास बँकेला त्वरीत कळवा.
व्यवहारानंतर END किंवा CANCEL बटण दाबून सत्र पूर्ण करा.
अनोळखी व्यक्तीकडून मदत घेण्याचे टाळा.
टीप: वरील माहिती केवळ वाचक म्हणून प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहोत. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.