कर्ज घेताना काही महत्त्वाच्या गोष्टी लक्षात ठेवणं आवश्यक आहे.
कर्ज घेताना कमी व्याजदर असलेलं कर्ज निवडा.
कर्जाच्या हप्त्यांची आरामात परतफेड करू शकू, इतकंच कर्ज घ्या.
कर्ज घेताना कोणतीही समस्या असल्यास, तर तज्ज्ञांचा सल्ला घ्या.
व्याजदर आणि इतर शुल्कांबद्दल Hidden Charges बद्दल सविस्तर माहिती मिळवा.
कर्ज घेण्यापूर्वी सर्व अटी, शर्ती आणि महत्त्वाचे मुद्दे स्पष्ट करून घ्या.
आपलं क्रेडिट हिस्ट्री चांगली ठेवा जेणेकरून कर्ज मिळवण्यासाठी काही अडचण येणार नाही.
आपला क्रेडिट स्कोअर चांगला ठेवण्याचा प्रयत्न करा.
कर्जाचा कालावधी आणि हप्त्यांचं नियोजन याची स्पष्टता ठेवा.
कर्जासाठी लागणारी सर्व कागदपत्रं पूर्ण आणि तपासून ठेवा.
टीप : वरील सर्व गोष्टी माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. एबीपी माझा यातून कोणताही दावा करत नाही.