मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा डिसेंबर महिन्याचा हप्ता कधी मिळणार याकडे सर्व महिलांचं लक्ष लागलं होतं.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नागपूर येथे विधानसभेत अधिवेशन संपल्यानंतर लाडक्या बहिणींच्या खात्यात रक्कम वर्ग केली जाईल, असं म्हटलं होतं.
हप्ता देण्याची प्रक्रिया 24 डिसेंबरपासून सुरु करण्यात येणार आहे.
लाडक्या बहिणींना 1500 रुपयांप्रमाणं सहावा हप्ता मिळणार आहे.
2100 रुपये देण्याचं आश्वासन महायुती सरकारनं दिलं होतं, त्यामुळे नवा हफ्ता 2100 रुपयांचा असेल, असा अनेक बहिणींचा समज होता.
पण, देवेंद्र फडणीवसांनी दिलेल्या माहितीनुसार, लाडक्या बहिणींना पहिला हफ्ता 1500 रुपयांचा असेल, अशी माहिती मिळत आहे.
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या पाच हप्त्यांची रक्कम पात्र लाभार्थी महिलांच्या खात्यात वर्ग करण्यात आली होती.
जुलै ते नोव्हेंबर पर्यंत 1500 रुपयांप्रमाणं 7500 रुपये महिलांच्या खात्यात जमा करण्यात आले होते.
निवडणुकीपूर्वीच महिलांच्या खात्यात नोव्हेंबर महिन्याची रक्कम आली होती.
आता डिसेंबरच्या हप्त्याची रक्कम आजपासून महिलांच्या खात्यात येणार आहे.
एकंदरीतच, लाडक्या बहिणींना 2100 रुपयांसाठी वाट पाहावी लागणार आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, अर्थसंकल्प सादर झाल्यानंतरचं महिलांना 2100 रुपयांचा हप्ता मिळू शकेल.