आपला कर वाचावा यासाठी नोकरदार वर्ग वेगवेगळ्या मार्गांचा शोध घेत असतो.
शासकीय नियमांच्या अधीन राहून वेगवेगळ्या माध्यमातून कर वाचवता येतो.
प्रत्येकालाच वाटतं की माझा कर वाचायला हवा. पण प्रत्येकवेळीच हे शक्य नसते.
कर वाचावा म्हणून बँका आपल्या ग्राहकांना टॅक्स सेव्हर एफडीचा पर्याय देतात.
अशा प्रकारच्या एफडींचा कालावधी हा पाच वर्षे असतो.या योजनेत ग्राहकांना 7 ते 8 टक्क्यांनी रिटर्न्स मिळतात.
पीपीएफ योजेवरही सरकार तुम्हाला करसवलत देते. तुम्ही पीपीएफ योजनेत गुंतवणूक करत असाल तर तुम्हाला,
प्राप्तिकर कायद्यातील 80सी अधिनियमाअंतर्गत तुम्हाला वर्षाला 1.50 लाख रुपयाची करसवलत मिळू शकते.
ही 15 वर्षांच्या मुदतीची योजना आहे. यात जमा केलेल्या पैशावर तुम्हाला सध्या 7.10 टक्यांचे व्याज मिळत आहे.
ईक्विटी लिंक्ड सेव्हिंग स्कीम (ELSS) ही योजनादेखील करबचतीसाठी चांगला पर्याय आहे.
या योजनेअंतर्गत तुम्हाला 3 वर्षांपर्यंत गुंतवणूक करावी लागते. त्यानंतर या योजनेच्या मदतीने तुम्हाला करात सवलत मिळते.
(टीप : वरील सर्व गोष्टी माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. एबीपी माझा यातून कोणताही दावा करत नाही. )