कायदेशीररीत्या घरात किती रोख रक्कम ठेवता येते?

Published by: श्रद्धा भालेराव, एबीपी माझा, मुंबई
Image Source: pexels

आजकाल बहुतेक कामं डिजिटल पद्धतीनं होतात, जसं की ऑनलाइन पेमेंट.

Image Source: pexels

ऑनलाइननंतरही आपल्याला रोख रकमेची गरज भासते, जसं की लग्न, उपचार किंवा रोजच्या गरजांसाठी.

Image Source: pexels

अशा परिस्थितीत, आजही अनेक लोक घरात रोख रक्कम ठेवतात, पण घरात रोख रक्कम ठेवणं योग्य आहे की नाही? याबाबत लोकांमध्ये संभ्रम आहे.

Image Source: pexels

जाणून घेऊयात, कायदेशीररित्या घरात किती रक्कम ठेवता येते?

Image Source: pexels

इन्कम टॅक्स विभागानं रोख रक्कम ठेवण्याची कोणतीही थेट मर्यादा निश्चित केलेली नाही.

Image Source: pexels

तुम्ही तुमच्या घरात लाखो रुपये ठेवू शकता, पण अट आहे की, ते पैसे तुमच्याकडे कायदेशीर मार्गानं आलेले असावेत.

Image Source: pexels

ते पैसे तुमच्या उत्पन्नाचे किंवा योग्य स्रोताचे असले पाहिजेत, आयकर विभाग विचारल्यास, पैसे कुठून आले, हे तुम्हाला सांगावं लागेल.

Image Source: pexels

उत्पन्न कर कायद्यातील काही कलमे, जसं की 68 ते 69B यामध्ये लागू होतात.

Image Source: pexels

या कलमांनुसार, स्रोताशिवाय असलेले पैसे बेकायदेशीर ठरतील...

Image Source: pexels