आधार कार्डवरचा पत्ता कसा बदलता येतो?

Published by: श्रद्धा भालेराव, एबीपी माझा, मुंबई
Image Source: pti

अनेकदा लोक त्यांच्या आधार कार्डमध्ये बदल करण्यासाठी किंवा नाव, पत्ता आणि फोटो बदलताना खूप गोंधळतात.

Image Source: pti

जर तुमच्या आधार कार्डवरील पत्ता (Address) बरोबर नसेल, तर तुम्ही तो अपडेट किंवा बदलू शकता.

Image Source: pti

तुम्हाला आधार कार्डवरचा पत्ता कसा बदलायचा? सविस्तर जाणून घेऊयात...

Image Source: pexels

आधार कार्डमध्ये ऑनलाइन आणि ऑफलाइन दोन्ही प्रकारे पत्ता बदलता येतो.

Image Source: pexels

ऑनलाईन पत्ता बदलण्यासाठी, तुम्हाला UIDAI च्या वेबसाइटवर जावं लागेल.

Image Source: pexels

त्यानंतर लॉग इन करून पत्ता अपडेट करावा लागेल आणि नवा पत्ता टाकावा लागेल.

Image Source: pti

यासोबत तुम्हाला ऍड्रेस प्रूफ अपलोड करावे लागतील, आणि मग सबमिट करावं लागेल.

Image Source: pexels

आधार कार्डवरचा पत्ता बदलण्यासाठी यूआयडीनं 45 कागदपत्रांची यादी जारी केली आहे, या कागदपत्रांचा वापर करून तुम्ही आधार कार्डमध्ये पत्ता बदलू शकता.

Image Source: pexels

या दस्तावेजांमध्ये पासपोर्ट, बँक स्टेटमेंट, पासबुक, रेशन कार्ड, मतदार ओळखपत्र, ड्रायविंग लायसन्स आणि ओळखपत्र यांसारख्या अनेक गोष्टींचा समावेश आहे.

Image Source: pexels

याव्यतिरिक्त, ऑफलाईन बदलासाठी, तुम्हाला आधार नोंदणी केंद्रावर जावं लागेल.

Image Source: pti