मागील महिन्यात सोन्याच्या दराने विक्रमी उच्चांक गाठत एक लाख रुपये प्रति 10 ग्रॅमचा टप्पा ओलांडला होता.

Published by: जयदीप मेढे
Image Source: Meta AI

मात्र त्यानंतर सोन्याच्या दरात झपाट्याने घसरण झाली असून सध्या या दरात सतत चढउतार सुरू आहेत.

Image Source: Meta AI

आज प्रति 10 ग्रॅम सोन्याच्या दरात 100 रुपयांची घसरण नोंदवण्यात आली आहे.

Image Source: Meta AI

आर्थिक राजधानी मुंबईत 22 कॅरेट सोनं 89,350 रुपये प्रति 10 ग्रॅम या दराने विकले जात आहे, तर 24 कॅरेट सोनं 97,480 रुपयांना उपलब्ध आहे.

Image Source: Meta AI

दरम्यान, मुंबईत चांदीच्या दरात कोणताही बदल झालेला नाही.

Image Source: Meta AI

एमसीएक्सवर सोन्याचा भाव 0.42 टक्क्यांनी घसरून 96,014 रुपये प्रति 10 ग्रॅमवर आला आहे.

Image Source: Meta AI

तर चांदीचा दर 0.04 टक्क्यांनी वाढून 98,090 रुपये प्रति किलो इतका झाला आहे.

Image Source: Meta AI

राष्ट्रीय राजधानी दिल्लीत 22 कॅरेट सोनं 89,490 रुपये प्रति 10 ग्रॅम दराने उपलब्ध आहे, तर 24 कॅरेट सोन्याचा दर 97,620 रुपये इतका आहे.

Image Source: Meta AI

भारतीय समाजात सोनं आणि चांदीला विशेष महत्त्व आहे.

Image Source: Meta AI

ते केवळ संपन्नतेचे प्रतीक नसून, विवाह, सण-उत्सव यांसारख्या प्रसंगी शुभ मानले जाते.

Image Source: Meta AI

त्यामुळे अशा काळात यांची खरेदी मोठ्या प्रमाणावर होते.

Image Source: Meta AI

टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.

Image Source: Meta AI