EPFO, ने नोकदारांना PF काढण्याच्या नियमांमध्ये काही बदल केले आहेत, ज्याचा पगारदारांना मोठ्या प्रमाणात फायदा होऊ शकेल.
Published by: जगदीश ढोले
Image Source: unsplash
अशा लोकांना मदत म्हणून सरकारने अलीकडेच EPF शी संबंधित नियमांमध्ये बदल केले आहेत.
Image Source: unsplash
यामुळे विशेषतः अशा नोकरदारांना दिलासा मिळेल जे पहिल्यांदाच घर खरेदी करणार आहेत, पण त्यांना डाउन पेमेंटची व्यवस्था करण्यात अडचण येत होती.
Image Source: unsplash
नवीन EPF नियमांनुसार कर्मचारी आता त्यांचे पहिले घर खरेदी करण्यासाठी पीएफ रकमेच्या 90% रक्कम काढू शकतील.
Image Source: unsplash
याआधी अशा प्रकारे पैसे काढण्यासाठी सदस्यांना पाच वर्षे सतत नोकरी करणे आवश्यक होते पण,आता नवीन नियमांनुसार सदस्यांना त्यांचे EPF खाते उघडल्यानंतर तीन वर्षांनीच पैसे काढता येतील.
Image Source: unsplash
सदस्य आयुष्यात फक्त एकदाच पीएफ ॲडव्हान्स पैसे काढण्याचा हा पर्याय वापरू शकतात.
Image Source: unsplash
ऑनलाइन दाव्यासाठी चेक किंवा बँक पासबुकची सत्यापित छायाप्रत अपलोड करण्याची आवश्यकता रद्द करण्यात आली आहे.
Image Source: unsplash
EPF खाते UAN शी लिंक करताना बँक खातेधारकाचे नाव सत्यापित केले जात असल्याने आता चेक किंवा पासबुकची सत्यापित प्रत आवश्यक नाही.
Image Source: unsplash
या सोप्या प्रक्रियेचा फायदा अशा सदस्यांनाही होईल जे त्यांचे विद्यमान बँक खाते तपशील अपडेट करू इच्छितात.
Image Source: unsplash
आता त्यांचा नवीन बँक खाते क्रमांक आणि IFSC कोड प्रविष्ट करून हे करू शकतात, ज्याची पुष्टी आधार OTP द्वारे केली जाईल.
Image Source: unsplash
ऑटो-सेटलमेंट मर्यादा देखील वाढवण्यात आली आहे. याआधी फक्त 1 लाख रुपये मर्यादा होती जी आता 5 लाख रुपयांपर्यंत वाढवण्यात आली आहे.
Image Source: unsplash
यामुळे लोकांना 72 तासांच्या आत जलद पैसे मिळू शकतील.
Image Source: unsplash
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)