वर्ल्ड गोल्ड काऊन्सिलच्या नव्या रिपोर्टनुसार राजकीय आणि व्यापारी जोखीम कमी झाली तर सोन्याचे दर घसरण्याची शक्यता आहे.

Published by: जगदीश ढोले
Image Source: meta ai

जर अमेरिकन डॉलर आणि ट्रेजरी यील्डमध्ये वाढ झाली, तर सोन्याच्या दरावर दबाव येऊ शकतो, असं रिपोर्टमध्ये म्हटलं आहे.

Image Source: meta ai

जर केंद्रीय बँकांनी सोने खरेदी कमी केली, आणि गुंतवणूकदारांची मागणीही घटली, तर दर कमी होऊ शकतात.

Image Source: meta ai

सध्या सोन्याचे दर 97,511 रुपये प्रति तोळा आहेत. दरात सातत्यानं वाढ होत आहे.

Image Source: meta ai

2025 मध्ये एक तोळा सोनं 20,000 रुपयांपेक्षा अधिकने महागलंय, आणि चांदीच्या किमतीतही एवढीच वाढ झाली आहे.

Image Source: meta ai

डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफ धोरणांमुळे सोनं गुंतवणुकीचा सुरक्षित पर्याय ठरलं, त्यामुळे मागणी वाढली.

Image Source: meta ai

3 नोव्हेंबर 2022 रोजी सोनं 1,429 डॉलर प्रति औंस इतकं स्वस्त होतं. आता ते 3,287 डॉलर प्रति औंसवर पोहोचलंय.

Image Source: meta ai

म्हणजेच दरवर्षी सुमारे 30% च्या सीएजीआरने सोन्याच्या किमती वाढल्या आहेत.

Image Source: meta ai

अभ्यासात असं दिसून आलं की, जेव्हा जागतिक शांतता आणि स्थिरता वाढते, तेव्हा सोन्याची मागणी कमी होते.

Image Source: meta ai

गुंतवणूकदार आता सावध झालेत, कारण सोन्याचे दर खूप वाढले असून भविष्यात घसरणे शक्य आहे.

Image Source: meta ai

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)

Image Source: pinterest