सोन्याचा जगातील सर्वात मोठा साठा चीनमध्ये सापडला आहे.
चीनमध्ये सोन्याचं घबाड सापडलं असून हा आतापर्यंतचा सोन्याचा जगातील सर्वात मोठा साठा असल्याचं सांगितलं जात आहे.
याआधी दक्षिण आफ्रिकेतील 'साऊथ डीप' खाणीमध्ये सर्वात मोठा साठा सापडला होता, पण चीनने आता त्याला मागे टाकलं आहे.
चीनमध्ये सापडलेल्या मोठ्या सोन्याच्या खाणीत उच्च प्रतीच्या अत्यंत मौल्यवान खनिजांचा साठा असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.
चिनी सरकारी प्रसारमाध्यमांनी दिलेल्या माहितीनुसार, हुनान प्रांतातील पिंगजियांग भागात ही मोठी सोन्याची खाण सापडली आहे.
हुनान प्रांतातील भूवैज्ञानिकांनी दोन किलोमीटर खोलीवरील सोन्याचे 40 पट्टे शोधण्यात यश मिळवलं आहे.
प्राथमिक माहितीनुसार, या भागात 300 मेट्रिक टन सोने असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.
चीनमध्ये सापडलेल्या या सोन्याच्या खाणीची किंमत सुमारे 83 अब्ज अमेरिकन डॉल असल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे.
सध्या जागतिक पातळीवर सोने उत्पादनात चीन आघाडीवर असून एकूण उत्पादनाच्या 10 टक्के वाटा चीनचा आहे.
नवीन सोन्याची खाण सापडल्यामुळे सोन्याच्या आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत आता चीनचा दबदबा पाहायला मिळणार आहे.