LPG गॅस ते क्रेडिट कार्ड, 1 डिसेंबर 'या' महत्वाच्या नियमांमध्ये होणार बदल
पुढच्या महिन्यापासून म्हणजे 1 डिसेंबरपासून अनेक आर्थिक नियमांमध्ये बदल होणार आहेत.
बदललेल्या आर्थिक नियमांचा थेट परिणाम सर्वसामान्यांच्या खिशावर होणार आहे.
दर महिन्याच्या पहिल्या तारखेला पेट्रोल-डिझेलच्या नव्या किमती जाहिर केल्या जातात. पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीत बदल होण्याची शक्यता आहे.
सरकार दर महिन्याच्या 1 तारखेला एलपीजीच्या किमतीत बदल करते. व्यावसायिक गॅस सिलेंडर आणि घरगुती एलपीजी गॅस सिलेंडरच्या किमतींमध्ये बदल होऊ शकतो.
गॅसच्या किंमतीत जर पुन्हा वाढ झाली तर सर्वसामान्यांच्या खिशाला झळ बसण्याची शक्यता आहे.
1 डिसेंबर 2024 पासून, क्रेडिट कार्डे डिजिटल गेमिंग प्लॅटफॉर्म/व्यापारी यांच्याशी संबंधित व्यवहारांवर रिवॉर्ड पॉइंट ऑफर करणार नाहीत.
भारतीय रिझर्व्ह बँक (RBI) ने डोमेस्टिक मनी ट्रान्सफर (DMT) साठी नवीन नियम जाहीर केले आहेत, जे 1 नोव्हेंबर 2024 पासून लागू होतील. या नियमांचा उद्देश फसवणुकीसाठी बँकिंग चॅनेलचा गैरवापर रोखणे हा आहे.
संशयास्पद OTP अनेकदा मोठ्या फसवणुकीचं कारण ठरतात, ज्यामुळे अनेकांच्या बँक खात्यातून पैसे गायब होतात. पण, या प्रकरणांमध्ये गुन्हेगारांचा शोध घेणं खूप कठीण आहे.
आता भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरण (TRAI) म्हणजेच ट्रायने टेलिकॉम कंपन्यांना मेसेज ट्रेसिबिलिटी प्रदान करण्यास सांगितलं आहे.
याचा अर्थ, टेलिकॉम कंपन्यांना मेसेज कुठून जनरेट झाला आहे, हे शोधण्याची व्यवस्था करावी लागेल. जर टेलिकॉम कंपन्या या नियमाचं पालन करू शकत नसतील तर युजर्सना ओटीपी मिळणं बंद होऊ शकतं.