शेअर मार्केटऐवजी तुम्हाला दुसऱ्या ठिकाणी तुम्हाला जर गुंतवणूक करायची असेल तर तुम्ही पोस्टाच्या योजनेत पैशांची गुंतवणूक करु शकता.

Published by: स्नेहल पावनाक

तुम्ही एखाद्या पोस्ट ऑफिस योजनेत गुंतवणूक करण्याचा विचार करत असाल तर एका सरकारी योजनेची माहिती जाणून घ्या.

Published by: स्नेहल पावनाक

ही योजना पोस्ट ऑफिस अंतर्गत चालवली जाते. या योजनेंतर्गत केवळ व्याजातून 12 लाख रुपयांहून अधिक कमाई होऊ शकते.

Published by: स्नेहल पावनाक

त्याचबरोबर या योजनेअंतर्गत कर सवलतीचा लाभही दिला जातो. यामध्ये गुंतवणुकीची कमाल मर्यादा 30 लाख रुपये आहे.

Published by: स्नेहल पावनाक

पोस्ट ऑफिस ज्येष्ठ नागरिक बचत योजना ही एक ठेव योजना आहे. यामध्ये 5 वर्षांसाठी ठराविक रक्कम गुंतवली जाते.

Published by: स्नेहल पावनाक

ज्येष्ठ नागरिक या योजनेत जास्तीत जास्त 30 लाख रुपये गुंतवू शकतात, तर किमान गुंतवणुकीची मर्यादा 1000 रुपये आहे.

Published by: स्नेहल पावनाक

सध्या SCSS वर 8.2 टक्के वार्षिक व्याज दिले जाते. व्याज तिमाही आधारावर सुधारित केले जाते.

Published by: स्नेहल पावनाक

जर तुम्ही या योजनेत वार्षिक 30 लाख रुपये गुंतवले तर तुम्हाला 5 वर्षांत 8.2 टक्के दराने 12,30,000 रुपये व्याज मिळेल.

Published by: स्नेहल पावनाक

यामध्ये प्रत्येक तिमाहीत 61,500 रुपये व्याज म्हणून जमा केले जातील. तुम्हाला 5 वर्षानंतर एकूण 42 लाख 30 हजार रुपये मॅच्युरिटी रक्कम म्हणून मिळेल.

Published by: स्नेहल पावनाक

जर तुम्ही या योजनेत 5 वर्षांसाठी 15 लाख रुपये जमा केले तर सध्याच्या 8.2 टक्के व्याजदरानुसार तुम्हाला 5 वर्षात केवळ व्याजातून 6 लाख 15 हजार रुपये मिळतील.

Published by: स्नेहल पावनाक

व्याजाची तिमाही आधारावर गणना केल्यास, दर तीन महिन्यांनी 30,750 रुपये व्याज मिळेल.

Published by: स्नेहल पावनाक

अशा प्रकारे 15 लाख रुपये आणि व्याजाची रक्कम जोडून एकूण 21 लाख 15 हजार रुपये मॅच्युरिटी रक्कम म्हणून प्राप्त होतील.

Published by: स्नेहल पावनाक

ज्येष्ठ नागरिक बचत योजनेअंतर्गत, 60 वर्षे किंवा त्याहून अधिक वयाची कोणतीही व्यक्ती या योजनेचा लाभ घेऊ शकते.

Published by: स्नेहल पावनाक

टीप : वरील सर्व गोष्टी माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. एबीपी माझा यातून कोणताही दावा करत नाही.

Published by: स्नेहल पावनाक