लाडकी बहिण योजनेचा पुढचा हफ्ता कधी मिळणार?

Published by: स्नेहल पावनाक

महायुती सरकारची लाडकी बहिण योजना विधानसभा निवडणुकीत वरदान ठरली.

Published by: स्नेहल पावनाक

मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसह महायुती सरकारला या योजनेचा फायदा झाला.

Published by: स्नेहल पावनाक

आता नवीन सरकार स्थापन झाल्यानंतर सरकार लाडकी बहिण योजनेसंदर्भात पहिला निर्णय घेण्याची शक्यता आहे.

Published by: स्नेहल पावनाक

निवडणुकीमुळे लाडकी बहिण योजनेचे नोव्हेंबर महिन्यापर्यंतचे आगाऊ पैसे महिलांच्या खात्यात जमा करण्यात आले होते.

Published by: स्नेहल पावनाक

आता लाडक्या बहिणींना डिसेंबर महिन्याच्या हफ्त्याची प्रतीक्षा आहे. दरम्यान, आता ही रक्कम 1500 वरुन 2100 करण्यात येण्याची शक्यता आहे.

Published by: स्नेहल पावनाक

लाडकी बहीण योजनेत 1500 रुपये देण्यात येत होते. मात्र, ही रक्कम वाढवण्याची घोषणा महायुतीच्या जाहीरनाम्यामध्ये करण्यात आली होती. त्यानुसार या योजनेचे 1500 वरून 2100 रुपये करण्यात येतील, असं जाहीर करण्यात आलं होतं.

Published by: स्नेहल पावनाक

नवीन सरकार स्थापन होताच पहिल्याच कॅबिनेट बैठकीमध्ये लाडकी बहिण योजनेचे पैसे वाढवण्यासंदर्भात निर्णय घेतला जाण्याची शक्यता आहे.

Published by: स्नेहल पावनाक

हा निर्णय घेतल्यानंतर डिसेंबर महिन्यातच लाडकी बहिण योजनेचा हफ्ता महिलांच्या खात्यात जमा होण्याची शक्यता आहे.

Published by: स्नेहल पावनाक

त्यामुळे नवीन सरकार कधी स्थापन होतं याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.