हॉलिवूड अभिनेता ब्रेंडन फ्रेझरने 'ऑस्कर 2023' चा सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार पटकावला आहे. सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार स्वीकारताना ब्रेंडनला अश्रू अनावर झाले होते. सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कारावर आपलं नाव कोरल्यानंतर ब्रेंडनने सिनेमाच्या संपूर्ण टीमचे आभार मानले आहेत. ब्रेंडन फ्रेझरला 'द वेल' या सिनेमातील भूमिकेसाठी पुरस्कार मिळाला आहे. सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कारावर आपलं नाव कोरल्यानंतर ब्रेंडनने ट्रॉफीसोबतचा फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे. ऑस्कर पुरस्कार सोहळ्यातील ब्रेंडन फ्रेझरचा डॅशिंग लूक चाहत्यांच्या पसंतीस उतरला आहे. ब्रेंडन फ्रेझर हा हॉलिवूडचा एक लोकप्रिय अभिनेता आहे. ब्रेंडन फ्रेझरने आजवर हॉलिवूडच्या अनेक गाजलेल्या सिनेमांत काम केलं आहे. ब्रेंडन फ्रेझरला सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार मिळाल्यानंतर चाहते सोशल मीडियाच्या माध्यमातून अभिनंदनाचा वर्षाव करत आहेत. ब्रेंडन फ्रेझरचा 90 व्या दशकातील 'अॅक्शन हीरो' आहे.