आज 'बीटिंग द रिट्रीट', सोहळा पार पडणार आहे 'बीटिंग द रिट्रीट' ही एक जुनी लष्करी परंपरा आहे पूर्वीच्या युद्धांमध्ये सूर्यास्त झाला की युद्ध थांबवले जायचे, ते थांबल्याची धून वाजवली जायची आणि मग दोन्ही बाजूंचे सैन्य त्यांच्या छावणीमध्ये परतायचे या जुन्या पद्धतीवरुन 'बीटिंग द रिट्रिट' या सोहळ्याची संकल्पना रचण्यात आली आहे जगभरातल्या अनेक देशांच्या सैन्यदलांचा असा कार्यक्रम होतो. भारतानेही प्रजासत्ताक दिनाच्या सोहळ्यात ही परंपरा सामील केली आहे. नवी दिल्लीच्या ऐतिहासिक विजय चौकात आज सशस्त्र दलांचे सर्वोच्च कमांडर राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या उपस्थितीत 'बीटिंग द रिट्रीट' सोहळा पार पडणार आहे या सोहळ्यात पहिल्यांदाच होणारा एक हजार ड्रोनचा शो, यावर्षीच्या ठळक वैशिष्ट्यांपैकी एक असेल 'आझादी का अमृत महोत्सव' म्हणून साजरा होत असलेल्या स्वातंत्र्याच्या 75 वर्षांच्या स्मरणार्थ उत्सवाचा एक भाग असणार आहे