श्रेयस तळपदेने अनेक सिनेमांत काम केलं आहे. अनेक चित्रपटांमध्ये त्याने आपल्या कॉमेडीने प्रेक्षकांना खूप हसवलं आहे. श्रेयसने अनेक गंभीर भूमिकादेखील केल्या आहेत. श्रेयस सध्या 'माझी तुझी रेशीमगाठ' या मालिकेच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. सोशल मीडियावर श्रेयसचा मोठा चाहतावर्ग आहे. श्रेयसने आपल्या करिअरमध्ये वाईट काळही पाहिला आहे. ‘इकबाल’ या सिनेमाच्या माध्यमातून श्रेयसला चांगलीच लोकप्रियता मिळाली आहे. अल्लू अर्जुनच्या 'पुष्पा'च्या सिनेमाच्या हिंदी व्हर्जनला श्रेयस तळपदेने आवाज दिला आहे. श्रेयस तळपदेचा 'आपडी-थापडी' हा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. श्रेयस तळपदे या सिनेमात अभिनेत्री मुक्ता बर्वेसोबत दिसणार आहे.