आलिया भट्ट आणि रणबीर कपूर यांचा ब्रह्मास्त्र हा चित्रपट गेल्या काही दिवसांपासून बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत आहे. ब्रह्मास्त्र चित्रपट रिलीज होऊन केवळ तीन दिवस झाले आहेत. तीन दिवसांमध्ये या चित्रपटानं 100 कोटींचा टप्पा पार केला आहे. लवकरच हा चित्रपट 200 कोटी क्लबमध्ये सामील होईल, असं म्हटलं जात आहे. ब्रह्मास्त्र चित्रपटानं पहिल्या दिवशी 37 कोटींची कमाई केली. तर दुसऱ्या दिवशी या चित्रपटानं 42 कोटींची कमाई केली. तिसऱ्या दिवशी 46 कोटींचे कलेक्शन या चित्रपटानं बॉक्स ऑफिसवर केलं. तीन दिवसांमध्ये या चित्रपटानं 125 कोटींची कमाई केली. अनेक नेटकरी सोशल मीडियावर पोस्ट शेअर करुन ब्रह्मास्त्र चित्रपटाचं कौतुक करत आहेत. जगभरातील बॉक्स ऑफिसवर या चित्रपटानं 160 कोटींपेक्षा जास्त कमाई केली आहे. चित्रपटामध्ये आलिया आणि रणबीरसोबतच अमिताभ बच्चन, नागार्जुन आणि मौनी रॉय या कलाकारांनी देखील प्रमुख भूमिका साकारली आहे. अयान मुखर्जीने या सिनेमाचं दिग्दर्शन केलं आहे.