बॉलिवूड अभिनेता रणबीर कपूर आणि आलिया भट्टचा 'ब्रह्मास्त्र' हा सिनेमा नुकताच प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. 'ओपनिंग डे'ला या सिनेमाने जगभरात 75 कोटींची कमाई केली होती. तर रिलीजच्या दुसऱ्या दिवशी या सिनेमाने जगभरात 85 कोटींची केली आहे. अशाप्रकारे ब्रह्मास्त्र सिनेमाने 100 कोटींचा आकडा पार केला आहे. आतापर्यंत या सिनेमाने जगभरात 160 कोंटीचा गल्ला जमवला आहे. 410 कोटींच्या बजेटमध्ये 'ब्रह्मास्त्र' सिनेमाची निर्मिती करण्यात आली आहे. 'ब्रह्मास्त्र' सिनेमा सध्या बॉक्स ऑफिसवर चांगलाच धुमाकूळ घालतो आहे. ब्रह्मास्त्र सिनेमात रणबीर कपूर आणि आलिया भट्ट मुख्य भूमिकेत आहेत. 'ब्रह्मास्त्र' हा सिनेमा जगभरात 8,913 स्क्रीन्सवर प्रदर्शित झाला आहे. 'ब्रह्मास्त्र' सिनेमातील 'केसरिया', 'देवा देवा' ही गाणी प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत आहे.