धावपळीच्या जीवनामुळे अनेकदा आपले आरोग्याकडे लक्ष कमी होते.

मात्र आहारामध्ये योग्य गोष्टींचा समावेश केला तर आपले हृदय निरोगी राहू शकते.

1 ब्रोकोली सूप
यामध्ये असलेले कॅरोटीनॉइड ल्युटीन हे आपल्या हृदयासाठी उत्तम ठरते.यामुळे अनेक आजारही बरे होतात.

ज्यामुळे कोलेस्ट्रॉलची पातळी नियंत्रणामध्ये राहते

2 गाजर आणि बीटरूट
गाजरमध्ये आणि बिटमध्ये असलेले नायट्रेट अत्यंत फायदेशीर मानले जातात.

त्यामुळे शरीरातील नायट्रेट रक्त प्रवाह सुधारते.

3 काकडीचा रस
काकडीमुळे आपले शरीर हायड्रेट राहते.

पण याव्यतिरिक्त काकडीमध्ये भरपूर पाणी आणि फायबर असल्याने पचनक्रिया व्यवस्थित राहते.

4 पुदिन्याचा रस
पुदिना फक्त पदार्थांची चवच नाही वाढवत तर यामध्ये अँटिऑक्सिडंट्स, व्हिटॅमिन ए आणि व्हिटॅमिन के आढळतात.

यामुळे शरीरातील खराब कोलेस्ट्रॉल कमी होते.

5 पालक रस
पालक हा आयर्नचा उत्तम स्रोत आहे. यामध्ये व्हिटॅमिन के आणि नायट्रेटने देखील असते.

यामुळे रक्तदाब नियंत्रणात ठेवूनहृदयही निरोगी ठेवते. यामुळे आहारात पालक चा समावेश तुमच्या हृदयासाठी फायदेशीर ठरतो.