अभिनेता सलमान खानला (Salman Khan) 2019 मधील प्रकरणात हायकोर्टानं (High Court) दिलासा दिला आहे.



2019 मध्ये एका पत्रकाराला मारहाण प्रकरणी डी.एन. नगर (D N Nagar) पोलीस ठाण्यात सलमानवर गुन्हा दाखल झाला होता. या प्रकरणावर आज सुनावणी झाली.



हे संपूर्ण प्रकरणच हायकोर्टाकडून रद्द करण्यात आलं आहे.



अंधेरी दंडाधिकारी कोर्टानं बजावलेलं समन्स हायकोर्टानं रद्द करत सलमानला या प्रकरणात मोठा दिलासा दिला आहे.



हायकोर्टानं सलमान खानच्या विरोधातील हे संपूर्ण प्रकरण रद्द केलं आहे त्यामुळे आता सलमानला कोर्टाकडून दिलासा मिळाला आहे.



अभिनेता सलमान खान हा चित्रपटांबरोबरच त्याच्या वैयक्तिक आयुष्यामुळे देखील चर्चेत असतो.



सलमानचे लवकरच काही आगामी चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहेत.



'किसी का भाई किसी की जान', 'टायगर-3' हे चित्रपट देखील लवकरच रिलीज होणार आहेत.



तसेच तो किक-2 तसेच नो एन्ट्रीच्या सिक्वेलमधून सलमान प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.



सलमानच्या आगामी चित्रपटांची प्रेक्षक उत्सुकतेने वाट बघत असतात.