अभिनेत्री अनुष्का शर्माला (Anushka Sharma) हायकोर्टानं दणका दिला आहे.



2012-13 आणि 2013-14 मधील थकबाकी वसूल करण्यासाठी विक्री कर विभागाने (Sales Tax Department) बजावलेल्या नोटीसविरोधात अनुष्काने हायकोर्टात याचिका दाकल केली होती.



आता अनुष्काची ही याचिका मुंबई उच्च न्यायालयानं फेटाळली आहे. अपिलीय लवादाकडे दाद मागण्याचे निर्देश हायकोर्टानं अनुष्काला दिले आहेत.



तिथं दिलासा नाही मिळाला तर पुन्हा हायकोर्टात येण्याची मुभा अनुष्काला देण्यात आली आहे.



लवादाची व्यवस्था असताना, थेट हायकोर्टात का आलात? असा सवाल हायकोर्टनं अनुष्काला विचारला आहे.



विक्रीकर विभागाचा युक्तिवाद हायकोर्टानं मान्य केला आहे.



लवकरच अनुष्काचा चकदा एक्सप्रेस हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे







सध्या ती या चित्रपटाचे शूटिंग करत आहे. या चित्रपटाची निर्मीती अनुष्काच्या प्रोडक्शन हाऊसने म्हणजेच क्लीन स्लेट फिल्म यांनी केली आहे.



अनुष्काच्या आगामी चित्रपटांची प्रेक्षक उत्सुकतेने वाट बघत आहेत.