पाकिस्तानमधील (Pakistan) प्रसिद्ध अभिनेत्री सबीना फारुखचा (Sabeena Farooq) चाहता वर्ग मोठा आहे.



सबीनाला पाकिस्तानी (Pakistani Actress) मालिका 'तेरे बिन' (Tere Bin) मुळे विशेष लोकप्रियता मिळाली. या मालिकेत तिनं हया ही भूमिका साकारली आहे.



'तेरे बिन' मधील हया या भूमिकेच्या माध्यमातून सबीना घराघरात पोहचली.



सबीनाला पाकिस्तानाबरोबरच भारतात देखील लोकप्रियता मिळाली.



नुकत्याच एका मुलाखतीमध्ये सबीनानं भारतातील प्रेक्षकांचा पाकिस्तानी मालिकांना मिळणाऱ्या प्रतिसादाबद्दल सांगितलं.



तेरे बिन मालिकेतील सबीना फारुखनं एका मुलाखतीमध्ये तिच्या हया या भूमिकेला भारतातील प्रेक्षकांच्या मिळणाऱ्या प्रतिसादाबद्दल सांगितलं. ती म्हणाली, भारतातील लोकांच्या रिअॅक्शनबद्दल जेवढं बोलावं तेवढं कमी आहे. लोक मालिकेबाबत खूप चांगली प्रतिक्रिया देतात.



पुढे सबीनानं सांगितलं,'माझ्या भूमिकेला भारताकडून जसा प्रतिसाद आणि प्रेम मिळते, तसे पाकिस्तानकडून मिळत नाही. जे माझ्यासाठी खूपच आश्चर्यकारक आहे. नकारात्मक भूमिकेमुळे इथले लोक माझ्याबद्दल खूप वाईट बोलतात.'



सबीना ही सोशल मीडियावर देखील अॅक्टिव्ह असते. सबीना तिच्या वेगवेगळ्या लूकमधील फोटो सोशल मीडियावर शेअर करते.



सबीनाला इन्स्टाग्रामवर 468K फॉलोवर्स आहेत. मालिकांमधील सबीनाच्या अभिनयाला प्रेक्षकांची विशेष पसंती मिळाली.



सबीनानं 2016 मध्ये प्रदर्शित झालेल्या जनान चित्रपटामध्ये काम केलं.