टेलिव्हिजन स्टार टीना दत्ता वयाच्या 32 व्या वर्षीही सिंगल आहे.

टीना दत्ता 'बिग बॉस 16'मध्ये दिसून आली होती, त्यावेळी तिचं नाव शालीन भनोटसोबत जोडलं गेलं होतं.

Published by: श्रद्धा भालेराव, एबीपी माझा, मुंबई

टीना दत्तानं ई-टाईम्सशी बोलताना सांगितलेलं की, शालीनसोबत कनेक्टेड झाल्याचा आणि त्याच्यासोबत नाव जोडलं गेल्याचा मला पश्चाताप आहे.

टीनानं म्हटलं होतं की, मला 'बिग बॉस'मध्ये शालीनसोबत कनेक्ट झाल्याचा खूपच पश्चाताप आहे.

जर मी शोमध्ये त्याला भेटली नसती किंवा त्याच्यासोबत माझी मैत्री झाली नसती, तर 'बिग बॉस'मधला माझा प्रवास खूपच वेगळा आणि चांगला झाला असता.

शालीननं माझ्या कॅरेक्टरवर प्रश्न उपस्थित केले, तो एवढा अग्रेसिव्ह झालेला की, त्यानं एकदा मला मारण्याचाही प्रयत्न केला होता.

टीना दत्तानं म्हटलं होतं की, ज्यावेळी मी त्याची खरी इमेज सर्वांसमोर आणण्याचा प्रयत्न केला, त्यावेळी तो माझ्या विरोधात गेला

टीना दत्तानं म्हटलं होतं की, तिला आता कधीच संपूर्ण आयुष्यात शालीन भनोटसोबत बोलायचं नाही, एवढंच काय तर, कोणतंही नातं ठेवायचं नाही..

मला नाही वाटत की, माझ्या आयुष्यात आता मी कधीही त्याला भेटीन, असं टीना दत्ता म्हणाली होती.