अभिनेत्री मलायका अरोरी तिच्या प्रोफेशनल लाईफपेक्षा पर्सनल लाईफमुळे जास्त चर्चेत असते.

अर्जून कपूरसोबतच्या ब्रेकअपमुळे मलायका पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. हे दोघे 5 वर्षांहून जास्त काळ एकमेकांना डेट करत होते.

डेटिंगच्या काळात हे कपल सोशल मीडियावर एकमेकांसाठी भरभरुन प्रेम व्यक्त करायचे, पण आता या दोघांचा ब्रेकअप झाला आहे.

या दोघांच्या ब्रेकअपची चर्चा होती, पण अलिकडेच अर्जून कपूरने मलायकासोबत ब्रेकअप झाल्याचं मान्य केलं आहे.

आता मलायकाचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

या व्हिडीओमध्ये मलायका अरोराने एक टी-शर्ट घातलं आहे, ज्यामध्ये तिच्या लाईफबद्दलची अपडेट शेअर केली आहे.

मलायकाच्या या टी-शर्टने सर्वांचं लक्ष वेधलं आहे.

मलायकाच्या टी-शर्टवर लिहिलं आहे, मी बोरिंग बेबी आहे, फक्त पैसे कमवते आणि घरी परत येते.

मलायका अरोराच्या या व्हिडीओ चाहत्यांच्या प्रतिक्रिया समोर येत आहेत.