दिवंगत अभिनेता सुशांत सिंह राजपूत आणि सारा अली खान एकत्र 'केदारनाथ' चित्रपटात दिसले होते. 'केदारनाथ'च्या चित्रीकरणादरम्यान, सुशांत आणि सारा एकमेकांच्या खूप जवळ आले होते. सुशांतचा केअरटेकर रईसनं IANS शी बोलताना यासंदर्भात खुलासा केला होता. रईसनं सांगितलं होतं की, सुशांत सरांना त्यांच्या वाढदिवसाच्या दिवशी दमन ट्रीपवर सारा अली खानला प्रोपोज करायचं होतं. केअरटेकरनं सांगितलं की, सुशांत सरांना प्रपोज केल्यानंतर सारा अली खानला गिफ्टही द्यायचं होतं. रईसनं सांगितलं की, दमन ट्रीप झालीच नाही, त्यामुळे सुशांत सर साराला प्रपोज करू शकले नाहीत. त्यानंतर 2019 मध्ये त्यांच्या ब्रेकअपबाबत मला माहिती मिळाली. रईसनं पुढे बोलताना सांगितलं की, सारा सुशांतला भेटण्याच्या त्याच्या लोणावळ्यातील फार्महाऊसवर यायची. त्याच फॉर्महाऊसचा रईस केअरटेकर होता, असं स्वतः त्यानं सांगितलेलं केअरटेकरनं दिलेल्या माहितीनुसार, 2018 मध्ये थायलँड ट्रीपनंतर सारा आणि सुशांत थेट फार्महाऊसवर आले होते. सुशांत आणि सारा जेव्हा-जेव्हा फार्महाऊसवर यायचे, त्यावेळी 3-4 दिवस थांबायचेच... ज्यावेळी मुलाखतीत रईसला विचारलं की, सुशांत साराला प्रपोज करणार होता, हे खरंय का? त्यावेळी रईसनं सांगितलं की, सुशांतचे मित्र म्हणत होते की, सुशांत साराला गिफ्ट देऊन प्रपोज करणार आहे. सारानं आपल्या सोशल मीडिया पोस्टमध्ये लिहिलेलं की, सुशांत सिंह राजपूत आणि केदारनाथ माझ्यासाठी नेहमीच स्पेशल असतील.