नीलम कोठारी आणि गोविंदा यांच्या नात्याबाबत सर्वांनाच माहीत आहे. पण, कधीकाळी नीलम आणि बॉबी देओल हेदेखील एकमेकांना डेट करत होते. बॉबी देओल आणि नीलम यांचं अपेअर तब्बल 5 वर्ष चाललं नीलम कोठारीनं 'स्टारडम' मॅग्झिनला दिलेल्या मुलाखतीत बॉबी देओलसोबतच्या अफेअरबाबत स्पष्ट वक्तव्य केलं होतं दोघांनी एकमेकांच्या सहमतीनं ब्रेकअप केल्याचं नीलमनं मुलाखतीत बोलताना सांगितलं तसेच, दोघांमधील ब्रेकअपचं कारण बॉबी देओलचे वडील धर्मेंद्र असल्याचंही तिनं सांगितलं मीडिया रिपोर्ट्सनुसार, धर्मेंद्र यांना त्यांची सून म्हणून कोणतीही अभिनेत्री नको होती. बॉबी देओल आणि नीलम यांच्यातील ब्रेकअपचं कारण पूजा भट्ट असल्याचंही सांगितलं जातं. मीडिया रिपोर्ट्सनुसार, बॉबी देओल आणि पूजा भट्ट यांच्यात वाढलेली जवळीक नीलमसोबतच्या ब्रेकअपचं कारण आहे. नीलम कोठारीनं अनेक मुखातींमध्ये बोलताना सांगितलं की, दोघांच्या ब्रेकअपला कोणतीच तिसरी व्यक्ती जबाबदार नव्हती. नात्यात असताना मला अचानक असं वाटलं की, माझं बॉबी देओलशी लग्न झालं असतं, तर मी अजिबात खूश राहिले नसते. मला एका स्टारची पत्नी बनून माझं करिअर संपवायचं नव्हतं. त्यावेळी मला खूप भिती वाटत होती, असं नीलम म्हणाली. नीलम म्हणाली की, मला बॉबी देओलच्या करिअरबाबत फारशी अपेक्षा नव्हती. मग अशा व्यक्तीसोबत कसा संसार थाटायचा, ज्याचं करिअर आता सुरू झालंय... दरम्यान, बॉबी देओलनं नंतर इंटिरियर डिझायनर तान्यासोबत लग्न केलं, तर नीलम कोठारीनं समीर सोनीसोबत लग्नगाठ बांधली