बहिणीच्या नवऱ्यासोबत अभिनेत्रीचा रोमान्स, फिल्मी करिअर फ्लॉप झाल्यावर...

Published by: स्नेहल पावनाक

अभिनेत्री सिंपल कपाडिया हिचा जन्म 15 ऑगस्ट 1958 रोजी झाला.

Published by: स्नेहल पावनाक

सिंपल कपाडियाने तिची सख्खी बहीण डिंपल कपाडिया प्रमाणे बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं.

पण, डिंपलप्रमाणे सिंपल कपाडियाला बॉलिवूडमध्ये खास नाव कमावता आलं नाही.

सिंपल कपाडियाने तिच्या बहिणीच्या नवऱ्यासोबत ऑनस्क्रिन रोमान्स केला.

सिंपल कपाडियाने 1977 मध्ये 'अनुरोध' चित्रपटातून पदार्पण केलं. या चित्रपटात तिने तिच्या बहिणीचा नवरा सुपरस्टार अभिनेते राजेश खन्ना यांच्यासोबत काम केलं होतं.

यानंतर सिंपल कपाडियाने अनेक चित्रपटांमध्ये काम केलं पण, तिला खास प्रसिद्धी मिळवता आली नाही.

फिल्मी करियर फ्लॉप झाल्यानंतर सिंपल कपाडियाने करियरसाठी वेगळा मार्ग निवडला. तिने कॉस्ट्युम डिझायनर म्हणून काम करण्यास सुरुवात केली.

कॉस्ट्युम डिझायन व्यवसायात सिंपलच्या करिअरला झळाळी मिळाली. तिला 'रुदाली' चित्रपटातील कपडे डिझाइन करण्यासाठी राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं.

या व्यवसायात सिंपलचा चांगलाच जम बसला होता, पण नियतीने तिच्या नशिबात काही वेगळंच लिहिलं होतं.

अचानक तिला कॅन्सरचं निदान झालं. यावर उपचार घेताना वयाच्या 51 व्या वर्षी सिंपलने जगाचा निरोप घेतला.