हेलनवर प्रेम नव्हतं, बदनामीच्या भीतीने लग्न केलं, असं सलीम खान यांनी सांगितलं होतं.
सलीम खान आधीच विवाहित होते आणि त्यांना मुलेही होती. पण तरीही त्यांनी अभिनेत्री हेलन यांच्याशी 1981 मध्ये लग्न केलं.
आर्थिक संकटात असलेल्या हेलन यांना सलीम खान यांनी मदत केली होती. हेलनकडे पैसे नव्हते, तेव्हा सलीम त्यांच्या मदतीसाठी पुढे सरसावले होते. त्यामुळे त्यांच्या अफेअरच्या बातम्या पसरल्या.
सलीम यांनी नीलेश मिश्रा यांना दिलेल्या मुलाखतीत सांगितलं होतं की, हेलनच्या चारित्र्याकडे कोणी बोट दाखवावं किंवा तिची बदनामी होऊ नये म्हणूनच त्यांनी हेलनशी लग्न केलं.
हेलनचं त्यांच्यावर प्रेम होतं, पण त्यांच्या स्वत:च्या मनात तिच्याबद्दल कोणतीही भावना नव्हत्या, असं सलीम खान यांनी 'झूम'च्या मुलाखतीत सांगितलं होतं.
सलीम यांनी सांगितलं की, त्यांनी हेलनला बदनाम होण्यापासून वाचवण्यासाठी तिच्याशी लग्न करण्याचा निर्णय घेतला, पण यामुळे त्याची पहिली पत्नी सलमासोबतच्या नात्यात दुरावा निर्माण झाला.
सलीम खान यांनी त्यांची पहिली पत्नी सलमाला सांगितलं होतं की, हेलन त्यांच्या आयुष्यात आहे. तिचा मान-सन्मान जपला जावा म्हणून त्यांनी हेलनशी लग्न करण्याचा निर्णय घेतला आहे.
सलीम खान यांनी सांगितलं की, हे ऐकून सलमा खूप चिडली होती. त्यांच्यात आणि सलीम खानमध्ये वाद सुरू झाला. पण, कालांतराने सर्व काही ठीक झालं.
वडिलांच्या दुसऱ्या लग्नानंतर आईला दुःखी झाल्यामुळे सलमान खान त्याच्या वडिलांचाही द्वेष करु लागला होता, असं 'भाईजान'ने 'फिल्मफेअर'ला सांगितलं होतं.
सलीम खान म्हणाले होते की, सलमाने हेलनसोबतचं माझं लग्न अतिशय चांगल्या पद्धतीने हाताळले आणि मुलांची काळजी घेतली. यासाठी ते त्यांचे सदैव ऋणी राहतील.