बॉलिवूडचा 'दबंग' सलमान खानचा क्लासी अंदाज पाहायला मिळाला आहे.

अभिनेता सलमान खान अलिकडेच एअरपोर्टवर स्पॉट झाला.

यावेळी सलमान खानच्या एअरपोर्ट लूकने सर्वांचं लक्ष वेधलं आहे.

अभिनेता सलमान खान याचा मोठा चाहतावर्ग आहे. तो नेहमीच कोणत्या न कोणत्या कारणामुळे चर्चेत असतो.

आता त्याच्या क्लासी एअरपोर्ट लूकवर सगळ्यांच्या नजरा खिळल्या आहेत.

ब्लॅक शर्ट, पँट, बॅरेट हॅट आणि शूज असा सलमानचा लूक एअरपोर्ट कॅज्यूअल अन् तितकाच क्लासी वाटत आहे.

त्याचा हा लूक चाहत्यांच्या चांगलाच पसंतीस उतरला आहे.

सलमान खान त्याच्या वेगळ्या फॅशन स्टाईलसाठी ओळखला जातो.

सलमान खान सध्या त्याच्या आगामी सिकंदर चित्रपटाच्या शूटींगमध्ये व्यस्त आहे.

यासोबतच सलमान खाने बिग बॉस 18 मध्ये वीकेंड का वारमध्येही दिसत आहे.