बॉलिवूडच्या परफेक्शनिस्ट अभिनेता आमिर खान आणि रीना दत्ताची लाडकी लेक इरा खान हिने डिप्रेशन, लैंगिक शोषण आणि टीबी सारख्या गंभीर आजारांशी लढा दिल्याचा खुलासा केला.
इराने सांगितलं की, सुमारे साडेतीन वर्ष ती रोज रात्री रडायची आणि झोपायची. मी अनेक वेळा कुटुंबियांना सांगितलं की, मला डॉक्टरांची गरज आहे. पिंकविलाला दिलेल्या मुलाखतीत तिने हे वक्तव्य केलं आहे.
हे असंच साडेतीन वर्षे सुरू होतं. रोज डोकेदुखीचा त्रास व्हायचा, असंही इराने सांगितलं.
इरा पुढे म्हणाली की, मी लहान असताना माझ्या पालकांचा घटस्फोट झाला. ती 6 वर्षांची असताना तिला टीबी आजाराचं निदान झालं.
मी 14 वर्षांची असताना माझं लैंगिक शोषण झालं, असा मोठा धक्कादायक खुलासा इराने यावेळी केला.
जेव्हा माझ्या पालकांचा घटस्फोट झाला, तेव्हा ते एका दिवसात घडलं नाही. जेव्हा ते घडलं, तेव्हा प्रत्येकाचं आयुष्य बदललं, असं इराने सांगितलं
माझं लैंगिक शोषण फक्त एक दिवस झालं नाही. अनेक वेळा तसं घडलं. या गोष्टींनंतर मी स्वतःला ओझं समजू लागले होते.
मी फक्त म्हणायचे की, मला झोपायचंय आणि दुसऱ्या दिवशी सकाळी जाग यायला नको. दररोज मी 10-12 तास झोपायचे, कारण मला जिवंत राहायचं नव्हतं.
अशा प्रकारचे नैराश्य इतर कुणालाही असेल तर त्याबद्दल ऐकून मला भीती वाटते. डिप्रेशन हा खूप वाईट आजार आहे. आजही मला त्याची भीती वाटते, असा खुलासा इराने यावेळी केला आहे.
इरा खान या सर्वातून गेल्यानंतर डिप्रेशनमध्ये यातून बाहेर पडायला तिला नुपूर शिखरेने मदत केली. या दोघांनी जानेवारी 2024 मध्ये लग्न केलं.