त्यानंतर तिचं नशीब उजळलं आणि ती बॉलिवूडची अभिनेत्री बनली. तिने शाहरुख खानसोबत एक ब्लॉकबस्टर चित्रपटही दिला.
माहिरा खान हिने पाकिस्तानी चित्रपटांसह बॉलिवूड आणि पंजाबी चित्रपटांमध्येही काम केलं आहे. माहिरा पाकिस्तानी इंडस्ट्रीतील टॉप अभिनेत्रींपैकी एक आहे.
रईस चित्रपटातून अभिनेत्री माहिरा खानने शाहरुख खान सोबत रईस चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. 2017 मध्ये आलेला हा चित्रपट सुपरहिट ठरला.
मिळालेल्या माहितीनुसार, माहिरा खान वयाच्या 17 व्या वर्षी उच्च शिक्षण घेण्यासाठी कॅलिफोर्नियाला गेली होती.
माहिरा खानने तिचे आयुष्य आणि सुरुवातीच्या संघर्षांबद्दल खुलासा करताना फुशिया मॅगझिनला दिलेल्या एका मुलाखतीत मोठा गौप्यस्फोट केला होता.
मी LA मध्ये राहत असताना झाडू मारुन आणि टॉयलेट साफ केली आहेत, असंही माहिराने सांगितलं आहे.