रिलीज झाल्यानंतर चारच दिवसांत 'पुष्पा 2 : द रूल'नं आपलं भांडवल अगदी सहज वसूल केलं आहे.
अॅडव्हान्स बुकिंगमध्येच पुष्पा 2 च्या वादळाचा अंदाज आला होता, त्यानंतर रिलीज होताच अल्लू अर्जुनच्या स्टारडमनं बॉक्स ऑफिसच ताब्यात घेतलं
फक्त 4 दिवसांत भांडवल वसूल केल्यानंतर 'पुष्पा 2 : द रूल'नं आता भांडवल वसूल करण्यास सुरुवात केली आहे.
'पुष्पा 2 : द रूल'नं रिलीज झाल्यानंतर पहिल्याच दिवशी 164.25 कोटींची कमाई केली आणि आजवरचा सर्वात मोठा ओपनर ठरला.
त्यानंतर दुसऱ्या दिवशी 93.08 कोटींचा गल्ला जमवला.
तिसऱ्या दिवशी पुष्पा 2 नं बॉक्स ऑफिस हादरवून सोडलं 119.25 कोटींची कमाई केली.
चौथ्या दिवशी तर पुष्पा 2 नं बॉलिवूड, टॉलिवूडचं नाहीतर चक्क हॉलिवूडपटांनाही पछाडलं आणि 141 कोटींचं कलेक्शन केलं.
पुष्पा 2 चं चार दिवसांचं टोटल कलेक्शन 529.45 कोटींचं झालंय.
मीडिया रिपोर्ट्सनुसार, पुष्पा 2 चं एकूण बजेट 400 कोटी रुपये होतं.
त्यामुळे फक्त आणि फक्त चारच दिवसांत चित्रपटानं आपलं बजेट वसूल केलं आहे.
देशभरातील थिएटर्समध्ये पुष्पा 2 नं धुमाकूळ घातला आहे.