या चित्रपटाच्या प्रदर्शनासाठी अवघे दोनच दिवस उरले आहेत.
पण, फक्त रिलीजपूर्वीच त्याची क्रेझ संपूर्ण जगभरात पसरली आहे.
त्यामुळेच सुकुमार दिग्दर्शित मास अॅक्शन ड्रामा असलेल्या या चित्रपटाची तिकिटं अॅडव्हान्स बुकिंगमध्ये हॉटकेकप्रमाणे विकली जात आहेत.
प्री-तिकीट सेलमध्ये या चित्रपटानं फायटर आणि कल्की 2898 एडी सारख्या ब्लॉकबस्टर चित्रपटांचेही रेकॉर्ड मोडले आहेत.
एवढंच काय तर, 'पुष्पा- 2 द रूल'च्या अॅडव्हान्स बुकिंगमुळे पीव्हीआर आयनॉक्सच्या शेअर्समध्ये सुमारे तीन टक्क्यांची वाढ झाल्याचं पाहायला मिळत आहे.
कंपनीच्या मार्केट कॅपमध्ये 426 कोटी रुपयांची वाढ झाल्याचंही पाहायला मिळत आहे.
गुजरात आणि महाराष्ट्रात प्री तिकीट सेलमध्ये पुष्पा 2 उत्तम परफॉर्म करतोय.
हा चित्रपट ओपनिंगच्या दिवशी सर्व रेकॉर्ड मोडण्यासाठी सज्ज आहे.
रिलीजचा दिवस जसजसा जवळ येतोय, तसतसे प्रमुख नॉन-नॅशनल चेन्समध्येही पुष्पाच्या अॅडव्हान्स बुकिंगमध्ये वाढ होण्याची अपेक्षा आहे.