अभिनेत्री श्वेता तिवारीने प्रचंड मेहनतीच्या बळावर इंडस्ट्रीमध्ये आपली छाप पाडली आहे.
टीव्ही मालिकांमध्ये साईड रोल करण्यापासून सुरुवात करणाऱ्या श्वेता तिवारीचं नाव आता बॉलिवूडपर्यंत पोहोचलं आहे.
श्वेता तिवारी फक्त टीव्ही अभिनेत्री नाही, तर तिने बॉलिवूड चित्रपट आणि वेब सीरिजमध्येही झळकली आहे. श्वेता तिवारी भोजपुरी इंडस्ट्रीमधील आघाडीच्या अभिनेत्रींपैकी एक आहे.
श्वेता तिवारीने अभिनय आणि मेहनतीच्या बळावर हे यश मिळवलं आहे, जे तिच्यासाठी मूळीच सोपं नव्हतं.
या मेहनतीमुळेच श्वेता तिवारी एकदा मोठ्या अडचणीत सापडली होती.
श्वेता तिवारीच्या चष्म्याचा नंबर खूप वाढला होता, त्यामुळे ती लेन्स वापरायची.
त्यावेळी ती सकाळी 5 ते 7 वाजेपर्यंते रेडिओ शो, नंतर सकाळी 7 ते संध्याकाळी 7 वाजेपर्यंत मालिकांचं शूटींग करायची.
त्यानंतर संध्याकाळी 7 ते रात्री 10 पर्यंत नच बलिये शोसाठी डान्स प्रक्टीस करायची. त्यानंतर रात्री 10 ते सकाळी 5 पर्यंत भोजपुरी चित्रपटांचं शूटींग करायची.
श्वेता तिवारीचं हे अत्यंत व्यस्त शेड्यूल सुमारे एक महिनाभर सुरु होतं. तेव्हा तिने एक महिने सतत लेन्स वापरले.
यामुळे तिच्या डोळ्यांना इंफेक्शन झालं आणि त्यामुळे रक्तवाहिन्या फुटल्या.
यामुळे तिला डोळ्यांनी दिसणं बंद झालं होतं, तिच्या डोळ्यातून अनेकदा रक्तस्त्राव व्हायचा.
यानंतर तिने लेसिक सर्जरी केली आणि तिची दृष्टी परत आली.