रणबीर कपूर आणि आलिया भट्ट मुलगी राहासोबत फुटबॉल मॅच पाहायला गेले होते.
राहा कपूर आणि आलिया भट्टसोबतच्या तिच्या क्युट एक्सप्रेशन्सवर सर्वांच्या नजरा खिळल्या होत्या.
मुंबईच्या विजयानंतर आलिया राहा मैदानात फेरफटका मारताना दिसले.
राहा हिने वडिलांसोबत ट्विनिंग करत मुंबई संघाची जर्सी घालत सर्वांचं लक्ष वेधून घेतलं होतं.
रणबीर कपूर आणि आलिया भट्ट मुलगी राहासोबत शनिवारी संध्याकाळ मुंबईत फुटबॉल सामना पाहायला पोहोचले होते.
राहा आलिया आणि रणबीरसोबत मुंबई सिटी एफसीसाठी चीअर करत होते.
आलिया भट्ट आणि रणबीर कपूर 2022 मध्ये राहा कपूरचे स्वागत केलं. ती आता दोन वर्षांची झाली.
रणबीर आणि आलिया दोघेही सध्या संजय लीला भन्साळी यांच्या 'लव्ह अँड वॉर' चित्रपटाचं शूटिंग करत आहेत.
'लव्ह अँड वॉर' चित्रपट 2026 मध्ये रिलीज होणार आहे.