अभिनेत्री कंगना रणौत ही सध्या बरीच चर्चेत आलीये.

तिने भाजपमध्ये प्रवेश केला असून हिमाचल प्रदेशातून उमेदवारी देण्यात आलीये.

त्यातच आता कंगनाने तिची नवी गाडी देखील खरेदी केलीये.

कंगना नुकतीच एका सलॉनमधून बाहेर पडताना स्पॉट झालीये. यामध्ये कंगना तिच्या नव्या गाडीत बसतानाचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय.

कंगनाने मर्सिजीड - मेबॅक जी. एल.एल. एस ही नवी गाडी घेतलीये. ही कंगनाची याच मॉडेलची दुसरी गाडी आहे.

तिच्याकडे आधीही एक मर्सिडीज आहे, जी S680 असं तिचं नाव आहे.

रिपोर्टनुसार, कंगनाची ही नवी गाडी 2.43 कोटी रुपयांची आहे. तिच्या आधीची गाडी ही 3.6 कोटी रुपयांची आहे.