बॉलीवूड अभिनेत्री सुष्मिता सेन आपल्या वैयक्तिक आयुष्यामुळे कायमच चर्चेत असते.

नुकतच अभिनेत्रीने तिच्या लग्नाविषयी आणि रिलेशनशिपविषयी भाष्य केलं आहे.

सुष्मिता सेनला 2023 मध्ये हृदयविकाराचा झटका आला होता. त्यावेळी तिचं नाव ललित मोदीसोबतही जोडलं गेलं होतं.

त्यावेळी तिचं रोहमन शॉलसोबत ब्रेकअप झाल्याच्या देखील चर्चा होत्या.

पण सध्या सुष्मिता ही रोहमनसोबतच असून दोघेही एकमेकांना डेट करत असल्याचं म्हटलं जात आहे.

अनेक कार्यक्रमांमध्ये दोघे एकत्र हजेरी देखील लावतात.

यावर बोलताना सुष्मिता सेननं म्हटलं की, अनेक लोकं त्यांच्या एक्ससोबत मैत्री करतात. पण त्यांना त्यांच्या मर्यादा महिती नसतात.

माझ्या आयुष्यातही असं झालं आहे, माझी आणि माझ्या एक्सची खूप चांगली मैत्री आहे.

आता राहिला प्रश्न मी लग्न कधी करेन याचा तर मी ते नक्की करणार आहे. पण योग्य वेळेवर योग्य व्यक्ती भेटल्यावर करेन.

सध्या सुष्मिताच्या या वक्तव्याची जोरदार चर्चा सुरु आहे.