अरुणा ईराणी या हिंदी सिनेसृष्टीतल्या एक आघाडीच्या अभिनेत्री आहेत.

चित्रपटातील त्यांच्या दर्जेदार भूमिकांची चर्चा झालीये.

पण या अभिनेत्रीनं तिचं वैयक्तिक आयुष्य कायमच खासगी ठेवलं.

नुकतच त्यांनी दिलेल्या एका मुलाखतीमध्ये कुकु कोहली यांच्यासोबतच्या नात्यावर भाष्य केलं आहे.

अरुणा ईराणी यांचे पती कुकु कोहली हे मोठे दिग्दर्शकही आहेत. पण त्यांच्यासोबतचं लग्न त्यांनी बराच काळ लपवून ठेवलं होतं.

पण आता त्यांनी याचं कारण सांगितलं आहे.

झूमला दिलेल्या एका मुलाखतीमध्ये त्यांनी म्हटलं की, 'मी माझ्या लग्नाविषयी कोणाला काही सांगितलं नाही. कारण माझ्या नवऱ्याचं याआधी लग्न झालं होतं.'

'पण मला नाही माहित की, त्यांचं आधी लग्न झालेलं हे मला माहित नाही, या अफवा कशा पसरल्या.'

'त्यांनी बायको मुलांसह सेटवर यायची, त्यामुळे मला माहित होतं की त्यांचं आधी लग्न झालंय. '

'माझ्यासाठीही हा निर्णय घेणं कठीण होतं, पण तरीही आमचं लग्न झालं.'

लग्नानंतर अरुणा ईराणी आई झाल्या नाहीत. यावर बोलताना त्यांनी म्हटलं की, 'मुलाला जन्म देणं आमच्यासाठी योग्य निर्णय नव्हता.'

'पण माझा नवरा माझ्यासाठी जगासोबत भांडलाय.'

अरुणा ईराणी यांनी कुकु कोहली यांच्यासोबत 1990 मध्ये लग्न केलं. त्यावेळी त्या 40 वर्षांच्या होत्या.
एका जुन्या मुलाखतीमध्ये अरुणा ईराणी यांनी म्हटलं होतं, की त्यांच कुकु कोहली यांच्याशी लग्न झालंय. पण त्यावेळी कुकु कोहली यांचा घटस्फोट झाला नव्हता.


Thanks for Reading. UP NEXT

जान्हवी कपूरचा स्ट्रपलेस गाऊन, किंमत ऐकून व्हाल थक्क

View next story