सलमान खान असो किंवा शाहरुख खान प्रत्येक स्टार, सुपरस्टारने आपल्या आयुष्यात चढ-उतार पाहिले आहेत. अक्षय कुमारने तर स्वत: त्याचे 16 चित्रपट फ्लॉप झाल्याचं सांगितलं आहे. पण आजही तो तितक्याच आत्मविश्वासाने उभा आहे. असाच एक बॉलीवूडचा स्टार आहे,ज्याने 50-60 नाही तर 180 फ्लॉप चित्रपट दिले. हा अभिनेता दुसरा तिसरा कुणी नसून मिथून चक्रवर्ती आहेत. डिस्को डान्सर म्हणून प्रेक्षकांच्या मनावर राज्य करणाऱ्या मिथून यांचा एक काळ फार वाईट होता. या बॉलीवूडच्या सुपरस्टारवर फ्लॉप फिल्म्स देण्याचा रेकॉर्ड आहे. आतापर्यंत मिथून यांचा हा रेकॉर्ड कोणीही मोडला नाहीये. 80,90 च्या दशकांमध्ये मिथून चक्रवर्ती प्रत्येक दिग्दर्शकांची पहिली पसंत असायचे. त्यांनी आतापर्यंत 270 चित्रपट दिले आहेत. ज्यामध्ये त्यांचे 180 चित्रपट फ्लॉप झालेत. मिथून यांचे एका वर्षात 12-12 चित्रपट प्रदर्शित व्हायचे.