मराठी सिनेविश्वात ‘अप्सरा’ म्हणून सोनाली कुलकर्णी हिने स्वतःची अशी वेगळी ओळख निर्माण केली आहे.
Published by: जगदीश ढोले
अभिनय क्षेत्राची कोणतीही पार्श्वभूमी नसताना सोनालीने मराठी इंडस्ट्रीमध्ये स्वतःचं वेगळं स्थान निर्माण केलं आहे.
सौंदर्य, अदाकारी आणि नृत्यशैलीच्या माध्यमातून चर्चेत राहणाऱ्या सोनालीने ‘बकुळा नामदेव घोटाळे’ या चित्रपटातून मराठी फिल्म इंडस्ट्रीमध्ये डेब्यू केले.
त्यानंतर बऱ्याच सुपरहिट चित्रपटांमधून तिने आपले अभिनय कौशल्य सिद्ध केले.
गाढवाचं लग्न, हाय काय नाय काय,सा सासूचा, इरादा पक्का, गोष्ट लग्नाची, क्षणभर विश्रांती, नटरंग, झपाटलेला 2, रमा माधव, क्लासमेट्स, मितवा, पोश्टर गर्ल, बघतोस काय मुजरा कर, तुला कळणार नाही, हम्पी, ती आणि ती, हिरकणी, ही सोनालीच्या मराठी सिनेमांची भलीमोठी यादी.
ती कायमच स्टायलिश अंदाजातील फोटो इन्स्टाग्रामवर शेअर करून चाहत्यांमध्ये चर्चेत राहण्याचा प्रयत्न करते.
आताही तिने एक नवा लूक शेअर करून चाहत्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे.
गुलाबी साडी नेसून सोनाली मुंबईमध्ये फोटोशूट करताना दिसत आहे. या फोटोमध्ये तिच्या मागे असलेला समुद्र आपण पाहू शकतो.
ताज हॉटेलसमोरच्या या फोटोमध्ये ती खूपच सुंदर दिसत आहे.