साराचं गोड हसणं असो किंवा गोंडस भाव. प्रत्येक वेळी तिने प्रेक्षकांची मने जिंकली. साराने फार कमी वेळात बॉलिवूडमध्ये आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. मात्र यावेळी साराने चाहत्यांना क्लीन बोल्ड केले आहे. साराने क्रिकेट खेळतानाचे काही फोटो चाहत्यांसोबत शेअर केले आहेत. हे फोटो सध्या जोरदार व्हायरल होतं आहेत. सारा अली खान सध्या 'अतरंगी रे' चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. अतरंगी रे' चित्रपट 24 डिसेंबरला प्रदर्शित होणार आहे.